मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दाखल होणार आहेत. यादरम्यान ते छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे पंतप्रधान वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे. तसेच, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.
Maharashtra| PM Modi to inaugurate Vande Bharat Express in Mumbai on 10th February. In the wake of PM’s visit, drones & flying activities banned in the jurisdiction of Airport PS, Sahar PS, Colaba PS, MRA Marg PS, MIDC PS & Andheri PS pic.twitter.com/W8BkVDMNuE
— ANI (@ANI) February 6, 2023
गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी मोदी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना भाजपच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता पुन्हा मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सध्या मोदी यांच्या मुंबईतील भेटीगाठी वाढल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.