करोना लसीवर जीएसटी माफ का नाही? सरकार असंवेदनशील?

करोना लसीवरील जीएसटी कर अद्याप कायमच ठेवण्यात आल्याने देशभर आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक जीवनरक्षक औषधे अर्थात लाईफ सेव्हिंग ड्रग्ज करमुक्त असण्याचे धोरण असताना अद्यापही कोव्हिड-19 च्या लसीवर जीएसटी कर माफ होणे आवश्‍यक होते.

मात्र, केंफ्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत लसीवरील कर माफ करण्यात न आल्याने चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

जीएसटी परिषदेच्या 44व्या बैठकीत लशीवर 5 टक्के जीएसटी कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हिडवरील उपचार आणि त्यासाठी आवश्यक उपकरणांवर लागू होणाऱ्या करात सवलत देण्यात आली आहे. वित्त सचिव तरुण बजाज यांच्या मते दरांमध्ये कपात एक-दोन दिवसात लागू करण्यात येईल.

नवे दर सप्टेंबरअखेरीपर्यंत लागू असतील. केंद्र सरकार लशी विकत घेत आहे आणि नागरिकांना मोफत लस देण्यात येईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. लशीकरणावर जीएसटी लागू होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  1. कोव्हिडशी निगडीत सेवा आणि उपकरणांवरील जीएसटीत घट
  2. विद्युतदाहिनीवरील जीएसटी घटून पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
  3. रुग्णवाहिकेवरील जीएसटी घटून 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
  4. रेमडेसीविर इंजेक्शनवरील जीएसटी 12हून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
  5. मेडिकल ग्रेड ऑक्सिजनवरील जीएसटीसुद्धा 12वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
  6. बीआयपीएपी मशीन, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, पल्स ऑक्सिमीटरवरील जीएसटी दरही 12वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आले आहेत.
  7. टॉक्सीलिजुमाब आणि एंफोटेरीसिन यांच्यावर जीएसटी लागू होणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.