पुणे – लसीकरणाची लगबग…

जिल्ह्यात 11 टक्‍के नागरिकांना दुसरा डोस

पुणे – जिल्ह्यात लसीचे डोस घेण्यासाठी 18 ते वर्षांवरील 57 लाख 44 हजार 664 इतके अपेक्षित लाभार्थी आहेत. यातील लसींचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 23 लाख 1 हजार 326 म्हणजे 40 टक्के इतकी आहे.

तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण 11 टक्के म्हणजे 6 लाख 25 हजार 880 इतके आहे. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवस तर कोवॅक्‍सिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी 28 दिवसांनंतर लस घेता येते. पुढील काही दिवस जिल्ह्यात लसींचा दुसरा डोस पूर्ण झाल्यांचे प्रमाण वाढणार आहे.

डॉक्‍टर, नर्स आदी आरोग्य विषयक सेवा पुरविणाऱ्यांमध्ये अपेक्षित लाभार्थी 1 लाख 27 हजार 361 निश्‍चित होते. प्रत्यक्षात लसीचा पहिला डोस घेतल्यांची संख्या 1 लाख 40 हजार 47 इतकी आहे. हे प्रमाण 110 टक्के इतके आहे आहे. तर दुसरा डोस घेतल्यांची संख्या 90 हजार 176 म्हणजे 71 टक्के इतकी आहे. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये अपेक्षित लाभार्थी 1 लाख 66 हजार 591 निश्‍चित करण्यात आले होते.

प्रत्यक्षात लसीकरणाचा पहिला डोस 2 लाख 5 हजार 254 नागरिकांनी घेतला आहे. याचे प्रमाण 123 टक्के इतके आहे. तर प्रत्यक्षात दुसरा डोस पूर्ण झालेल्यांची संख्या 83 हजार 896 म्हणजे 50 टक्के इतकी आहे. तर 60 वर्षांवरील नागरिकांची संख्या 10 लाख 67 हजार 775 इतकी अपेक्षित आहे. यातील 8 लाख 7 हजार 682 इतक्‍या जेष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 2 लाख 82 हजार नागरिकांनी घेतला आहे.

तर 45 ते 59 वयोगटात अपेक्षित लाभार्थी 18,47,581 असून यातील पहिला डोस 8 लाख86 हजार 108 इतकी आहे. यातील दुसरा डोस पूर्ण झालेल्यांची संख्या 1 लाख 57 हजार इतकी आहे. तर 18 ते 44 वयोगटातील 25,35 हजार 356 अपेक्षित लाभार्थी असून यातील पहिला डोस 2,62,235 नागरिकांनी तर दुसरा डोस 11 हजार 550 इतक्‍या नागरिकांनी घेतला आहे.

…म्हणून प्रमाण कमी
जिल्ह्यात लसीकरणात गती आली आहे. मात्र, लसींच्या अपुऱ्या डोसमुळे लसीचे उद्दिष्ट पूर्ण करता येत नाही. तसेच लसींच्या डोसमध्ये ठराविक दिवसांचे अंतर निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी कमी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.