पावसाची लक्षणे! पुढील 24 तासांत मुसळधार पडणार

पुणे – शहर परिसरात आगमनानंतर विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस सक्रीय होण्याची शक्‍यता आहे. येत्या 48 तासांत पुणे आणि लगतच्या परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात पुढील चोवीस तासांत मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्‍यता विभागाने वर्तविली आहे.

गेल्या आठवड्यात दोन दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. यादरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी वेगाने वाहणारे वारे आणि पावसाच्या हलक्‍या सरी अनुभवायला मिळाल्या.

तसेच गेल्या काही दिवसापासून शहरात दिवसभर ढगाळ हवामान होते. यावेळेत तापमनात घट होऊन गारवादेखील वाढला. मात्र, पावसाची अगदी तुरळक हजेरी होती. मात्र पुढील दोन दिवसांत पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिमेकडील वाऱ्यांचा जोर अद्याप पूर्णक्षमतेने कार्यरत नाही. तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव मध्यम स्वरुपात असल्याने पुणे जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले नव्हते. मात्र, ही स्थिती आता बदलत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.