काश्‍मीरमध्ये “जैश’चे नेतृत्व स्वीकारण्यास कोणीही तयार नाही 

श्रीनगर – काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत जैश-ए-मोहम्मदच्या नेतृत्वाला लक्ष्य केले. त्यामुळे परिस्थिती आता अशी आहे की, खोऱ्यात कोणीही जैशचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्यास तयार नाही, असे जीओसी 15 कॉर्पचे केजेएस धिल्लॉन यांनी सांगितले.

लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद ते बोल होते. धिल्लॉन म्हणाले, 2018 मध्ये एकूण 272 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि मोठया प्रमाणात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या वर्षात आतापर्यंत 69 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 12 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पुलवामानंतर 41 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यातले 25 जैश-ए-मोहम्मदमध्ये सक्रीय होते. यात 13 दहशतवादी पाकिस्तानी होते अशी माहिती धिल्लॉन यांनी दिली.

दहशतवादाविरुद्ध संरक्षण दलाने उघडलेल्या मोहिमेनंतर दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक काश्‍मिरी तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असे भारतीय लष्कराने बुधवारी सांगितले. दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे चांगले लक्षण आहे असे जम्मू-काश्‍मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.