पुणे, बारामतीच्या ईव्हीएम स्ट्रॉंगरूममध्ये

कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामाला छावणीचे स्वरूप


ईव्हीएम वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस ट्रॅक


गोदाम परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही, खडा पहारा

पुणे – पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य बंद असलेल्या ईव्हीएम कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी स्ट्रॉग रूम तयार करण्यात आली आहे. तब्बल एक महिन्याने (दि.23 मे) मतमोजणी होणार असल्याने ईव्हीएमच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. या गोदामाला छावणीचे स्वरूप आले असून याठिकाणी सीआरपीएफचे जवान आणि पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.23) मतदान पार पडले. पुणे लोकसभा मतदारसंघात 1 हजार 997 तर बारामती लोकसभा मतदारसंघात 2 हजार 372 मतदान केंद्र होती. या सर्व केंद्रांवरील मतदान झाल्यानंतर या मशीन विधानसभा मतदारसंघाच्या मुख्य ठिकाणी एकत्रित करण्यात आल्या त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व ईव्हीएम कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात आणण्यात आल्या. ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन एका गोदामात तर बारामतीमधील ईव्हीएम मशीन दुसऱ्या गोदाम ठेवण्यात आलेली आहे. दोन्ही गोदामात स्ट्रॉग रूम तयार करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखेखाली या रूम सील करण्यात आल्या आहेत. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली आहे. सीआरपीएफचे जवान यांचा याठिकाणी बंदोबस्त राहणार आहे. हे जवान 24 तास खडा पहारा देत आहे. याशिवाय स्ट्रॉग रूमच्या बाहेरच्या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.