“तुमचं पुण्यात कोणी ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देताय”; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

मुंबई : राज्यात करोनाचे संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या आसपास रुग्णसंख्येची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचेही पालन नागरिकांकडून होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी वीकेंड लॉकडाउनबद्दल माहिती दिली. लोकांनी दोन दिवसांचा लॉकडाउन पाळला नाही, तर मागच्या वर्षीसारखा लॉकडाउन आणावा लागेल, असे मंत्रिमंडळातील सहकारी म्हणत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.

अजित पवार यांच्या या विधानावरूनच निलेश राणे यांनी टीकास्त्र डागले आहे. “अजित पवार आपण रोज उठून लॉकडाउनची धमकी देता, पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील. लॉकडाउन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.