एक लाख कुटुंबांना मोफत धान्य?

अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू : अद्याप आदेश मिळाले नाहीत

पिंपरी – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या पंधरा दिवसांच्या टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर अन्नसुरक्षा अंतर्गत येणाऱ्या शिधापत्रिका धारकांना मोफत धान्याचे वितरण केले जाणार आहे. त्या अंतर्गत शहरातील जवळपास 1 लाख 12 हजारांच्या आसपास शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, एकाच वेळी दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. अद्याप वाटपाचे आदेश कार्यालयास प्राप्त झाले नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहरातंर्गत जवळपास तीनशेच्या आसपास स्वस्त धान्य दुकाने आहेत. एका दुकानात महिनाचे धान्य एकादाच येत असते. एका दुकानात रोज एक हजार किलो धान्य वाटप होते. तर, दोनशे ते अडीशे क्‍विंटल धान्य येते. त्या महिन्यात वाटप होणे अपेक्षित असते. शहराचा विचार केल्यास दिवसभरात जवळपास तीन हजार क्‍विंटल गहू व तांदूळ वाटप होते.

सद्यस्थितीत 1 लाख शिधापत्रिकाधारक असून, त्याचा लाभ घेणारी संख्या घेणारी संख्या जवळपास तीन ते साडेतीन लाखांच्या घरात आहेत. या ग्राहकांना मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. शहरात महिनाभरातील शिधापत्रिका धारकांची संख्या तुलनेने कमी जास्त होत असते.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस टाळे बंदी घोषित केली आहे. मात्र, या काळात गोरगरिबांचे हाल होवू नये, यासाठी अन्न सुरक्षातंर्गत येणाऱ्या शिधापत्रिका धारकांना मोफत गहू व तांदुळाचे वाटप महिनाभर केले जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे शहरात या योजनतंर्गत असणाऱ्या 1 लाख 12 हजार शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ होणार आहे.

शहरातील विविध धान्य दुकानांत चालू महिन्यातील जवळपास अर्ध्याहून अधिक धान्य वाटप झाले आहे. तर, अद्याप दुकानाचालकांना कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे रोजचे वाटप सुरु आहे. मोफत वाटपाची घोषण केल्यानंतर दुकानांसमोर गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याचे नियोजन व वाटपासंबंधित योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी दुकानचालकांनी केली आहे.

धान्याची मागणी वाढणार
सद्यस्थितीत एकूण शिधापत्रिका धारकांकडून रोजचे धान्य घेतले जात नाही. मात्र, मोफत असल्याने ती गरज ओळखून शिधापत्रिका धारकांची मागणी वाढणार आहे. त्या तुलनेने धान्यची मागणी वाढेल. मात्र, तो विचार करुन अतिरीक्‍त साठयाची तजबीज करण्यात आल्याची माहिती दुकानचालकांना जिल्हाधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.