नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आज वाढदिवस आहे. या वर्षी आपल्या जन्मदिनी ते तुरुगांत आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ट्विटरवर हे पत्र त्यांनी शेअर केले आहे.
#HBDPChidambaram @PChidambaram_IN @ANI @ndtv @IndiaToday @CNNnews18 @timesofindia @EconomicTimes @TimesNow @NewsX @the_hindu @IndianExpress @SunTV @PTTVOnlineNews @HindustanTimes @aajtak @dinathanthi @INCIndia @INCTamilNadu pic.twitter.com/9hSKqpSWcZ
— Karti P Chidambaram (@KartiPC) September 15, 2019
या पत्रात त्यांनी आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “आपण ७४ वर्षांचे झाले आहात मात्र, कोणीही ५६ इंचाची छातीवाला तुम्हाला रोखू शकत नाही.”
तुम्ही तुमचा वाढदिवस कधीही भव्य स्वरुपात साजरा केला नाही. मात्र, आजकाल आपल्या देशात प्रत्येक छोट्या गोष्टीवर मोठे सोहळे साजरे करण्यात येतात. तुमच्याशिवाय हा वाढदिवस पहिल्यासाऱखा होणार नाही. आम्हा सर्वांना तुमची उणीव जाणवत आहे. या पत्रात कार्ती यांनी आपल्या वडिलांच्या अटकेनंतर देश आणि जगभरात घडलेल्या महत्वाच्या गोष्टींचाही उल्लेख केला आहे. यामध्ये चांद्रयान 2 या मोहिमेसोबतच आर्थिक संकटावरुन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेल्या विधानाचाही समावेश त्यांनी पत्रात केला आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना १ सप्टेंबरला दिल्लीच्या विशेष कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टात प्रलंबित असून त्यावर २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.