Nitishkumar government Floor test। बिहारमध्ये उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी राजकीय गोंधळ वाढला आहे. राजदसोबतची आघाडी तोडून नितीशकुमार यांनी भाजसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता नितीश सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणारय. त्यानुसार उद्या नितीशकुमार बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत.
एकीकडे आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले आहे, तर दुसरीकडे भाजपने देखील आपल्या आमदारांना बोधगया याठिकाणी आहे. मंत्री श्रवण कुमार यांच्या घरी भोजनाला जेडीयूचे 5 आमदार उपस्थित राहिले नाहीत. यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या नेत्यांनी भाजपच्या आमदारांशीही संपर्क केल्याची चर्चा होत आहे. त्याची माहिती मिळाल्यानेच पक्षाने हा वर्ग आयोजित केल्याचे समजते. वरिष्ठ नेते नंदकुशोर यादव यांनी एनडीएचे सर्व आमदार एकत्र आहेत, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महागठबंधनमधील कॉँग्रेसच्या १९ आमदारांना हैदराबादला पाठवले आहे.
आमदारांसाठी 100 बेडची व्यवस्था Nitishkumar government Floor test।
आरजेडीच्या आमदारांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी रात्र काढली. त्यांची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. हे सर्व आमदार तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी राहत आहेत. संध्याकाळी आधी आमदारांचे सामान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले आणि नंतर त्यांच्यासाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली. आमदारांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यासाठी शंभरहून अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली होती.
जेडीयूने जारी केला व्हीप Nitishkumar government Floor test।
दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सोमवारी सर्व पक्षाच्या आमदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी जेडीयूने व्हीप जारी केला आहे. जेडीयूचे मुख्य व्हीप आणि राज्य सरकारमधील मंत्री श्रवण कुमार म्हणाले की, व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व गमवावे लागेल. कुमार हे मंत्री आहेत ज्यांनी जेडीयू आमदारांसाठी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित केले होते ज्यामध्ये पाच आमदार आले नाहीत, त्यानंतर सर्व प्रकारच्या अटकळ सुरू झाल्या.