पटना – बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-जेडी(यु)च्या एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. आज नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील मुख्यमंत्रीपदाची सातवी शपथ ठरली. त्यांच्यासह अन्य १४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे.
#WATCH: Nitish Kumar takes oath as the Chief Minister of Bihar for the seventh time – his fourth consecutive term. pic.twitter.com/5jcZXabSYw
— ANI (@ANI) November 16, 2020
नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू यादव यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील आज पार पडला.
Patna: Bharatiya Janata Party (BJP) leaders Tarkishore Prasad and Renu Devi take oath as the Deputy Chief Ministers of Bihar. pic.twitter.com/60kHuDDzOC
— ANI (@ANI) November 16, 2020
यंदाच्या निवडणुकांमध्ये राज्यात भाजपला मोठं यश मिळालं. भाजपने जेडी(यु) पेक्षा अधिक जागा पटकावल्या असल्या तरी निवडणुकांपूर्वी ठरलेल्या सूत्रानुसार नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली.