वाघोली येथे वाघेश्वर मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष वाघोली, दि.१६ (प्रतिनिधी)जनजीवन पूर्वपदावर येत असताना धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याची महाविकास आघाडीची हटवादी भूमिका भाजपने केलेली आंदोलने, पाठपुरावा व जनमताच्या प्रचंड रेट्यामुळे मागे घ्यावी लागली.
हा आनंद व भाविकांचा विजय वाघोली गावातील वाघेश्वर मंदिर येथे वाघेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.
यावेळी भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव, हवेली तालुका भाजपचे उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, हवेली तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अनिल सातव, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील, गणेश सातव, शरद आव्हाळे, विजय जाचक, गोरख सातव, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी वाघेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन एकमेकांना लाडू पेढ्याचा प्रसाद भरवत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी गणेश कुटे यांनी सांगितले की भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आली होती.भारतीय जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून मंदिराच्या आसपास पुन्हा एकदा गजबजलेली ठिकाण आणि नागरिकांना रोजगार मिळणार असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कुटे व प्रदीप सातव मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.