Nagpur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. 19 एप्रिल) रोजी नागपूर लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. भाजप विरुद्ध काॅंग्रेस अशी थेट लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे. भाजपकडून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तर काॅंग्रेसने विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना उमेदावारी दिली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ कसा आहे ? निवडणूकीशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया…
नागपूर लोकसभा निवडणूक महत्वाचे मुद्दे –
– नागपूर शहर हे नाग नदीच्या काठावर वसलेलं आहे.
– नागपूरची लोकसंख्या 46,53,570 इतकी आहे.
– जिल्ह्यात 14 तालुके असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.
– नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.
– 2014 मध्ये नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली. 2014 मध्ये 5,86,857 मतं आणि 2019 मध्ये 6,57,624 इतकी मतं मिळवून गडकरींनी दणदणीत विजय मिळवला.
– नागपुरात ओबीसी, एससी, आणि मुस्लीम मतदारांचं वर्चस्व आहे.
– तेली, कुणबी समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे.
– 1951 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात अनुसुया बाई पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या.
– 1956 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या.
– 1962 मध्ये माधव श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
– 1967 मध्ये पुन्हा काँग्रेसने या जागेवर विजय मिळवला. तेव्हा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीने जोर धरला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेच्या बाहेर गेली..
– 1971 मध्ये विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी विजय मिळवला.
– 1977 मध्ये ते पराभूत झाले आणि 1980 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला.
– या जागेवर आतापर्यंत काँग्रेसने 12 वेळा विजय मिळवला आहे.
– भाजपाने चार वेळा विजय मिळवला आहे.
– मराठा आरक्षण आंदोलनामुळे इथले ओबीसी नाराज आहेत.
– आतापर्यंतची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली आहे.
– तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळाली आहेत.
– 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांना 4 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती.
– 2014 च्या निवडणुकीतही ‘आप’ च्या उमेदवार अंजली दमानिया यांना चांगली मतं मिळाली होती.
– नागपुरातून काँग्रेसने विकास ठाकरे यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात उतरवले आहे.
– विकास ठाकरे हे स्थानिक नेते असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दोनवेळा लढत दिली.
– विकास ठाकरे यांनी यापूर्वी महापालिका आणि विधानसभा अश्या 8 वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
– विकास ठाकरे 2014 पासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
– विकास ठाकरे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते कुणबी आहेत.
– 1985 मध्ये ते काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले.
– विद्यार्थी काँग्रेस, युवक कँग्रेस, नागपूर शहर काँग्रेस असा प्रवास करत नागपूर महापालिकेत 2002 साली नगरसेवक झाले.
– 2002 ते 2005 पहिल्याच टर्मममध्ये त्यांना नागपूर महापालिकेचं महापौरपद मिळालं.
– 2010 मध्ये नागपूर महापालिकेत भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं.
– 2019 मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले.
– 2019 ची निवडणूक पाहिली तर भंडारा-गोंदियातून आलेल्या नाना पटोलेंनी गडकरींविरोधात लढत दिली होती. नाना पटोले नागपुरातले नेते नव्हते. तरीसुद्धआ त्यांनी गडकरींची लीड कमी केली होती.
– सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या नितीन गडकरींचं तगडं आव्हान विकास ठाकरेंसमोर आहे.
– विरोधातील नेतेही ज्यांना विरोध करताना दिसत नाही असं नितीन गडकरींचं व्यक्तीमत्व आहे.
– रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल असा दृश्य स्वरुपातला विकास नागपुरात दिसतो.
– नागपूरमध्ये पूर येऊन अर्ध नागपूर पाण्याखाली गेलं तेव्हा नागपूरकरांचा गडकरी यांच्याविरोधात रोष पाहायला मिळाला.
– 2014 पासून नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत.
– केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे.
– भारतात रस्तेबांधणीच्या कामात ते कायमच अग्रेसर आहेत.