नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपुरातील प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरात श्री रामजन्मभूमी येथील प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभ मुहूर्तावर पुजा आणि आरती केली. कुटुंबातील सदस्य आणि कर्ण बधीर शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत, गडकरींनी रामरक्षेचे पठण केले.
काही केंद्रीय मंत्र्यांबरोबरच गडकरी हेही अयोध्येतील सोहोळ्याला उपस्थित राहिले नव्हते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा अदि नेत्यांनी अयोध्येतील गर्दी टाळण्यासाठी आपआपल्या गावातच किंवा दिल्लीतच हा सोहळा साजरा केला. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. आजच्या दिनानिमीत्त तेथेही हा दिवस जल्लोषात साजरा झाला. आणि त्यानिमीत्त विविध मंदिरांमध्ये रोषणाई व आतषबाजीही करण्यात आली.