मुंबई : माजी मुख्यममंत्री नारायण राणे यांचे पूत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्ष कार्यालयात जाऊन त्यांनी आपला सदस्यत्व अर्ज भरला.
गेले दोन वर्ष राणे यांचा पक्षप्रवेश खोळंबला होता. शिवसेनेचा असणारा विरोधस कारण बाजपकडून देण्यात येत होते. नारायण राणे यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले . मात्र तरीही पक्षात घेतले नव्हते. अखेर त्यांनी गुरुवारी पक्ष सदस्यत्वाचा अर्ज दाखल केला.
यावर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे राजकीय दृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे.