मुंबई – ‘ मी आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो. ज्या पक्षात प्रवेश केला त्यांची ध्येय-धोरणं, विचार जाणून घेतले’, असे राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. सध्या नितेश राणेंचा संघाच्या दसरा मेळाव्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामुळे नेटीकऱ्यांनी त्यांना ट्रोल केल आहे. त्यावर राणेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे. नितेश राणेंनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नितेश राणे यांनी मंगळवारी संघाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांबरोबर जमिनीवर बसून हजेरी लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. संघ शाखेत शिस्तपालन करतानाचा त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी टीका केली आहे. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले. ‘नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत’, असे म्हणत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.