निर्मलाअक्का! तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा- जितेंद्र आव्हाड

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी आर्थिक पॅकेजचा पाचवा आणि अंतिम हप्ता जाहीर केला. यावेळी जेव्हा त्यांना प्रवासी मजुरांविषयी विचारले गेले तेव्हा त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आणि हे सर्व नाटक असून  कृपया राजकारण करू नका, अशी विनंती त्यांनी राहुल गांधीना केली.

राहुल गांधींनी शनिवारी दिल्लीत स्थलांतरित मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर बसले. यावर अर्थमंत्री म्हणाले, जेथे जेथे कॉंग्रेसचे राज्य सरकार आहे तेथे मजुरांना बोलवावे, सुविधा द्यावी आणि घरी पोहचावे. त्यांनी पाहिजे तितक्या गाड्यांची मागणी करावी. जेव्हा प्रवासी मजूर जात असतात तेव्हा राहुल गांधी त्यांच्या शेजारी बसून बोलत असतात. वेळ वाया घालवत का बसले आहेत, त्यांनी एकत्र चालले पाहिजे. हे सर्व नाटक आहे. आम्ही बर्‍याच राज्यांना सहकार्य करीत आहोत.

दरम्यान, या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी  उत्तर दिले. आव्हाड म्हणाले, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे ,त्यांच्या बरोबर चालणे. राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे माणुसकी इथे व्यक्त होतेच

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.