मुंबई – ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ने निपाह व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 100 दिवसांत ही लस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. nipah virus in india
लस तयार करण्यासाठी भागीदारांचा शोध घेतला जात आहे. ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चे DG राजीव बहल म्हणाले की, देशातील कोणत्याही नवीन आजारावर १०० दिवसांत लस तयार करण्याचा संकल्प केला आहे. nipah virus in india
आत्तापर्यंत केरळमध्ये निपाह व्हायरसचे सहा केस समोर आली असून, दोन संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या धोक्याबद्दल ICMR सतर्क आहे. निपाह व्हायरसची लस बनवण्याची तयारी सुरू केली आहे, याशिवाय डेंग्यू आणि टीबीच्या लसींवरही काम सुरू आहे. nipah virus in india
ते म्हणाले की निपाहमध्ये संक्रमित लोकांचा मृत्यू दर खूप जास्त आहे (40 ते 70 टक्के दरम्यान) तर कोविडमध्ये मृत्यू दर 2-3 टक्के होता. कोझिकोडमध्ये निपाह विषाणूच्या ताज्या प्रकरणाची पुष्टी झाली असून, राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या सहा झाली आहे, त्यापैकी दोन आधीच मरण पावले आहेत. nipah virus in india