Nipah Virus : देशात कोरोनानंतर आता निपाह व्हायरस (Nipah Virus) चा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. केरळ (Kerala) मध्ये सर्वप्रथम आढळलेल्या निपाह व्हायरसने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. केरळच्या निपाह व्हायरस(Nipah Virus)ची चाहूल आता त्याच्या शेजारच्या राज्यांना लागत आहे. कारण केरळच्या शेजारी असणाऱ्या कर्नाटकात निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
केरळमध्ये (Kerala) निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.
In view of Nipah cases in Kerala, Karnataka Govt issued a circular and has advised the general public to avoid unnecessary travel to affected areas of Kerala; intensify surveillance in the bordering districts to Kerala ( Kodagu, Dakshin Kannada, Chamrajanagara & Mysore) and at… pic.twitter.com/41whQrTgx2
— ANI (@ANI) September 15, 2023
कर्नाटक सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात जनतेनं केरळ (Kerala) मधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे.
कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकमधून केरळमध्ये प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, केरळच्या राज्य सरकारने आरोग्य विभागाचे मुख्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. 2018 साली निपाहच्या (Nipah Virus) संसर्गाच्या वेळी ‘एम 102.4 मनोक्लोनक अॅण्टीबॉडी’ आयात करण्यात आले होते. मात्र हा डोस देण्यात आला नव्हता कारण हे डोस भारतात येईपर्यंत संसर्ग कमी झाला होता.