NIA Raid : आयएसआयएस (ISIS ) या दहशतवादी संघटनेला भारतात पाय पसरण्यापासून रोखण्यासाठी NIA सातत्याने पावले उचलत आहे. त्यातच आज सकाळपासून राष्ट्रीय तपास संस्था (NIA) सध्या तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये छापेमारी करत असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सकाळपासून तपास यंत्रणेने ३० ठिकाणी छापे टाकले आहेत.
एनआयएने (NIA) सध्या, कोईम्बतूरमध्ये 21 ठिकाणी, चेन्नईमध्ये 3 ठिकाणी, हैदराबाद/सायबराबादमध्ये 5 ठिकाणी आणि तेनकासीमध्ये 1 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएची ही कारवाई तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये पसरलेल्या आयएसआयएस (ISIS ) मॉड्यूलविरोधात सुरू आहे.
#WATCH | NIA conducts raids at 30 locations in both Tamil Nadu and Telangana in ISIS Radicalization and Recruitment case. The raids are underway in 21 locations in Coimbatore, 3 locations in Chennai, 5 locations in Hyderabad/Cyberabad, and 1 location in Tenkasi.
(Visuals from… pic.twitter.com/KcCiO7SZ6u
— ANI (@ANI) September 16, 2023
तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये दहशत पसरवण्याच्या कटात आयएसआयएसच्या (ISIS ) भूमिकेचा तपास करण्यासाठी एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतरच एनआयएने दोन्ही राज्यांतील 30 ठिकाणी छापे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या छाप्यांमधून आयएसआयएसशी (ISIS ) संबंधित लोकांना पकडले जाणार आहे, ज्यांना देशात दहशत पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सहा राज्यांत छापेमारी
यापूर्वी झारखंड मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात एनआयएने (NIA) अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. यावेळी एका संशयिताला अटक करण्यात आली. NIA अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी फैजान अन्सारी याला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतरच हा छापा टाकण्यात आला. विद्यापीठाजवळ राहत असताना फैजान काही अतिरेक्यांच्या संपर्कात आला.
सहा राज्यात नऊ ठिकाणी छापे टाकून राहुल सेन उर्फ उमर बहादूर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान लॅपटॉप, पेन, ड्राईव्ह, मोबाईल फोन आदी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय एनआयएने आक्षेपार्ह साहित्य, एक चाकू आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रेही जप्त केली आहेत.