मंचर- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे भावाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पाच जणांसह इतर चार जणांवर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेजस शांताराम शिंदे (वय 27) आणि त्यांची पत्नी मयुरी शिंदे (रा. अवसरी खुर्द) हे दोघे मोटारसायकलवरून घरी जात असताना संदिप मुरलीधर टेमकर, धर्मा उर्फ पिन्या टेमकर, शशि उर्फ दाद्या टाव्हरे, बंटी टेमकर चौघे (रा. टेमकरमळा-अवसरी खुर्द), पप्पु हिंगे (रा, अवसरी बुद्रुक) आणि इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी तेजस शिंदे यांच्या मोटारसायकलला चारचाकी आडवी लावत तु माझ्या भावाला शिवीगाळ का केली. असे म्हणून संदीप टेमकर व त्याच्या साथीदारांनी शिंदे यांना मारहाण करत डोक्यात दुखापत केली. तसेच आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली तर जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली.पुढील तपास पोलीस जवान एच.सी.गिलबिले करीत आहे.