मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले.
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. त्यावर आता शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात आता नारायण राणेंचे सुपूत्र नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला सिंहाच्या गुहेत येण्याची हिंमत करु नका अशा शब्दांमध्ये आव्हान दिलं आहे. यातच नारायण राणेंचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्वीट करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
काय म्हणाले निलेश राणे
‘कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.’