Night Curfew In Delhi | राजधानी दिल्लीतही 30 एप्रिलपर्यंत रात्रीची ‘संचारबंदी’

नवी दिल्ली  – करोना फैलाव रोखण्याच्या उद्देशातून दिल्लीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आप सरकारने घेतला. त्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली. आता दिल्लीत 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 या कालावधीत संचारबंदी असेल. मात्र, अत्यावश्‍यक सेवांचे कर्मचारी, रूग्ण यांच्याबरोबरच विशिष्ट कार्यासाठी संचार करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.

इतर काही राज्यांप्रमाणेच दिल्लीतही मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातून दिल्लीत करोनाची चौथी लाट आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. अर्थात, लॉकडाऊनचे पाऊल उचलायचे की नाही याविषयीचा निर्णय जनमत विचारात घेऊन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.