चिंबळी -लॉकडाऊन हळूहळू शिथिल होण्यास प्रारंभ झाल्याने रखडलेली रस्त्याच्याकामाला थोडी गती मिळाली आहे. निघोजे ते कडवस्ती (कुरूळी, ता. खेड) रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
कुरूळी-निघोजे परिसरातील गेल्या 15 ते 20 वर्षापासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली असल्याने या भागात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या तसेच गोडाऊन उभारली असल्याने कुरूळी निघोजे रत्स्यावर रात्रंदिवस जडमालवाहू वाहनांची वर्दळ असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
मध्यतरी काम सुरू झाले होते मात्र, त्यातच लॉकडाऊन झाल्याने काम थांबले होते अखेर आता पुन्हा कामास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीच्या फंडातून या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी व्ही. एल. गाडीलकर यांनी सांगितले.