नवी दिल्ली – देशात करोनाचा वाढता धोका आणि आयपीएलमधील अनेक खेळाडूंना होणारी करोनाची लागण पाहता. यंदाचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सोहळा रद्द करण्यात आल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं.
दरम्यान, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रिकेट रसिक काहीसे नाराज झाल्याचं दिसून आलं. परंतु आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
We’re back! See you in St Kitts & Nevis 🇰🇳 The tournament gets underway on 28 August. #CPL21 #CricketPlayedLouder #SeeYouInStKitts #FollowYourHeart pic.twitter.com/k1RU5r9BTN
— CPL T20 (@CPL) May 16, 2021
कारण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची नुकतीच घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रसिकांना क्रिकेटचा तोच थरार आणि जोश अनुभवता येणार आहे.
BREAKING NEWS!!! The St Lucia Zouks announce 2021 retentions. Read more ▶️ https://t.co/SiyMbN71az #CPL21 #CPLDraft #CricketPlayedLouder #StLuciaZouks pic.twitter.com/cc819Mxc2e
— CPL T20 (@CPL) May 18, 2021
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन यांचं वादळ पुन्हा मैदानात घोंघावणार आहे. 28 ऑगस्टला स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी सीपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.