उद्धव ठाकरेंची माफीया टोळी एकापाठोपाठएक जेलमध्ये जाणार; NIA चा छाप्यानंतर भाजपची टीका

मुंबई- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयए कडून छापेमारी करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर सकाळी सहा वाजता हा छापा टाकण्यात आला आहे. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती एनआयए मिळाली आहे. प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या छापेमारीच्या कारवाईवर भाजप नेते प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, “हे अपेक्षितच होतं. सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मा हे मार्गदर्शक होते, हे सर्वश्रृत होतं. त्यामुळे अँटिलिया, मन्सुख हिरेन प्रकरणात वाझेंच्या मागे शर्मांचा हात असल्याचा संशय होता. एनआयएचे धागेदोरे शर्मा यांच्यापर्यंत पोहोचणारच होते. शर्मा आणि वाझे यांचे ज्या पद्धतीचे संबंध होते. त्यातून निश्चितच धागेदोरे एनआयएच्या हाती लागतील”

किरीट सोमय्या म्हणाले की, “आधी शिवसेनेचा प्रवक्ता वाझे जेलमध्ये गेला आणि आता शिवसेनेचे उपनेते, उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार. सध्या हे मन्सुख प्रकरणात जेलमध्ये जात आहेत. सचिन वाझेने चौकशीत अनिल परब यांचे नाव घेतले होते. आज प्रदीप शर्माच्या घरी कारवाई सुरु आहे. कधी न कधी अनिल परब यांच्या निवासस्थानी सुद्धा अशाच तपास यंत्रणा पोहोचणार”

“उद्धव ठाकरेंची माफीया टोळी एकापाठोपाठएक जेलमध्ये जाणार. अनिल परबचा दापोली रिसॉर्ट घोटाळा मी समोर आणला. या अनिल परब यांचा रिसॉर्टमधील पार्टनर आहे सदानंद कदम. कांदिवलीतील शिवसेनेचा शाखाप्रमुख या सदानंद कदमचा पार्टनर आहे. त्या शाखाप्रमुखाने मन्सुखला मारण्यासाठी आपली प्राडो गाडी सचिन वाझे आणि प्रदीप शर्माला दिली” असा निशाणा किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर लगावला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास करत आहे. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

संबंधित बातम्या  –
▶ एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIA चा छापा 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.