पुणे – महापालिकेविरोधात काळे झेंडे दाखवून निषेध

पुणे -आंबिल ओढा झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात विकसक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडून स्थानिकांची दिशाभूल आणि अपारदर्शक काम सुरू असल्याचा आरोप करत, आंबिल ओढा येथील दौऱ्यावर आलेल्या महापालिका प्रतिनिधी आणि प्राधिकरण अधिकारी यांना आंबिल ओढा झोपडपट्टीतील नागरिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.

यावेळी प्रशासनाकडून पुणे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार, परिमंडळ 5 चे उपायुक्‍त पुणे मनपा अविनाश संकपाळ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर, पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.

तसेच कृती समितीच्या माध्यमातून बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे, सिद्धार्थ दिवे, हनुमंत फडके, तानाजी लोहकरे, किरण सोमवंशी, सागर ढावरे, पुरुषोत्तम ओहाळ यांनी झोपडपट्टी धारकांच्या वतीने विषय मांडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.