किव्ह – क्रिमियामधील रशियाच्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या स्फोटात रशियाची 9 लढाऊ विमाने नष्ट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनचा हा हल्ला भविष्यात वाढू शकतो. यामुळे युद्धाची व्याप्तीही वाढू शकते, असेही युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी उघडपणे या स्फोटाची कोणतीही जबाबदारी स्विकारलेली नाही. मात्र या स्फोटावरून रशियाच्या हवाई दलाची खिल्ली मात्र उडवली आहे.
रशियाने 8 वर्षांपूर्वी क्रिमियावर ताबा मिळवला होता. त्याचे महत्व आता रशियाच्या लक्षात आले असेल. मुक्त युरोप हे अभियान रशियाने क्रिमियाला ताब्यात घेऊन सुरू केले होते. मात्र आता क्रिमियाला रशियाच्या तावडीतून मुक्त केले जाईल, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी काल रात्री देशवासियांना उद्देशून केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.