बर्लिन- रशियाच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधील नागरिक आणि शरणार्थ्यांच्या मदतीसाठी तब्बल ४.२ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. युक्रेनमधील युद्धाचा ताण स्थानिक नागरिकांवर अतिरिक्त प्रमाणात आला आहे. अनेक शरणार्थी देखील मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे नागरिक आणि शरणार्थ्यांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्राने मदतीचे आवाहन केले आहे.
मदतीसाठीच्या एकूण रकमेपैकी एक तृतीयांश म्हणजे ३.१ अब्ज डॉलर युक्रेनमधील ८.५ अब्ज स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी असेल. तर उर्वरित १.१ अब्ज डॉलर शरणार्थ्यांच्या मदतीसाठी असणार आहे. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या जनतेच्या मदतीसाठी हा निधी निर्धारित असणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून युक्रेनमधील बहुतेस सार्वजनिक इमारतींमध्ये शरणार्थ्यांनी आश्रय घेतला आहे. देशभरातील १४.६ दशलक्ष शरणार्थ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. तर ६.३ दशलक्ष नागरिक युक्रेन सोडून पळून गेले आहेत.
घरे, रुग्णालये आणि शाळांना होणारा वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि गॅसचा पुरवठा वारंवार खंडीत होतो आहे, युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्या आश्रय घेतलेल्या शरणार्थ्यांनाही तातडीने मदत गरजेची आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकार् यांनी सांगितले.