-लसीकरणानंतर विश्रांती घ्यावी
-उन्हाळा असल्याने भरपूर पाणी प्यावे
-लस घेतल्यावर काही काळ ताप येणे, अंगदुखी शक्य
-ॲलर्जीमुळे अंगावर पुरळ उठण्याची शक्यता
-दंड दुखणे, इंजेक्शनची जागा लाल झाली तरी काळजी नाही
-लस घेतल्यावर मोठा प्रवास, अवजड कामे काही दिवस टाळा
दोन्ही डोस घेतल्यावर काय फायदा होईल –
*कोरोनाचा धोका ९९ टक्के नाही
*कोरोनामुळे मृत्यू होणार नाही
*कोरोना झाला तरी तीव्र वेदना होणार नाहीत
*बहुतांश रुग्ण हे घरीच उपचाराने बरे होतील
~ हे अजिबात करू नका…
लस घेतल्यावर कमीत कमी ४५ दिवस मद्यपान आणि धूम्रपान थांबविणे आवश्यक आहे. मद्यपानाचा थेट प्रतिकारशक्तीशी संबंध आहे. मद्यपानाने प्रतिकार शक्तीस हानी पोचते. त्यामुळे मद्यपान टाळण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लस घेतल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.