पुणे जिल्हा विकेंड लाॅकडाऊन | जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश जारी; जाणून घ्या काय सुरु अन् काय बंद?

थेऊर – ग्रामपंचायत नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत कोव्हीड-१९ च्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सुधारित आदेश निगर्मित केले आहे. त्यांची अंमलबजावणी करणेकामी प्रशासन सज्ज झाले आहे.

शुक्रवार सायंकाळी ०६.०० ते सोमवार सकाळी ०७.०० या संचारबंदीच्या काळात मेडिकल, दुध विक्री दुकाने वगळून सर्व दुकाने बंद राहतील. दुध विक्रीची दुकाने सकाळी ०६.०० ते ११.०० या वेळेत सुरु राहतील.पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवठा करणारे कंपनी(ई- कॉमर्स) (Swiggie,Zomato, इ.) यांना आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करणेस परवानगी राहील. शुक्रवार सायंकाळी ०६.०० ते सोमवार सकाळी ०७.०० या संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना हॉटेलमध्ये जावून पार्सल घेणेस प्रतिबंध राहील.हॉँटेल, रेस्टॉरंट, बार मार्फत घरपोच पार्सल सेवा सुरु राहतील.

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाच्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस / नर्स यांना आठवडयातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत प्रवास करणेस परवानगी राहील.

स्पर्धा परीक्षा असल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेरातील खानावळी (मेस) या फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०८,०० या वेळेत सुरू राहतील. लसीकरण सुविधा आठवडयातील सर्व दिवस सुरु राहतील. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था (In situ Labour)आहेअसे बांधकाम शनिवार व रविवार सुरु ठेवता येईल.

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार राज्य उत्पादक शुल्क विभागाने विहीत केलेल्या वेळेनुसार सुरु राहतील. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील चष्प्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७,०० ते सायंकाळी ०६,०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वाहतुक (PMPML)अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवार बंद राहिल.मात्र ओला व उबेर या सारख्या टॅक्सी सेवा अत्यावश्यक कारणासाठी सुरु राहतील. या कार्यालयाकडील दिनांक ०५.०४.२०२१ अन्वये ज्या उद्योग / आस्थापना यांनी त्यांचे कर्मचा्यांची कोव्हिड-१९ निगेटिव्ह (RTPCR) प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसेच त्यांना Rapid Antigen Test करून कोव्हिड-१९ निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगल्यास परवानगी ग्राहय राहील.

सदर आस्थापनावरील कर्मचारी यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत त्यांनी कोव्हिड-१९ निगेटिव्ह( RTPCR/ RAT) असल्याचे १५ दिवसांची वैधता असणारे सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. आदेशामधील नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते किंवा नाही याबाबत स्थानिक प्रशासनाकडून तपासणी करणेचे आदेेश पारित झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.