पुणे – महामार्गावर थांबलेल्या कारला दुचाकीस्वार धडकून रस्त्त्यावर फेकला गेला. यानंतर त्याला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने चिरडले. ही घटना वारजे येथील डुक्कर खिंडीत खडली. याप्रकरणी कारचालक वसीम सय्यद आणि कंटेनर चालकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजीराव सोमीनाथ गदळे (30, रा. नऱ्हे आंबेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हा अपघात गुरुवारी रात्री घडला. कार चालक सय्यद हा चांदणी चौकाकडून वारजेच्या दिशेला चालला होता. कारमधून आवाज येत असल्याने त्याने कार महामार्गालगत उभी केली. इतक्यात मागून आलेली गदळे याची दुचाकी कारच्या मागच्या दरवाजाला धडकली. या धडकेत गदळे रस्त्यावर फेकला गेला. तो उठण्याआधीच त्याच्या अंगावरुन भरधाव कंटेनर गेला.