पुणे – पोलिसांच्या भीतीने पळून जाताना ट्रकखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई – बंगळुरू महामार्गावर ( Mumbai-Bangalore highway accident) टोनी ढाबा येथे घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री तीनच्या सुमारास चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर मारामारी सुरु असल्याचा कॉल आला. तेथे पोलीस ठाण्यातील मार्शल घटनास्थळी पोहोचले. तेथील भांडणे करणाऱ्यांची माहिती घेत असतानाच विनयकुमार रामभवन तिवारी (३५, रा.उत्तरप्रदेश ) हा तेथून पळून गेला.
तो पुढे मुंबई-बंगळुरू महामार्ग ओलांडत असताना त्याला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे करत आहेत. घटनास्थळी उपायुक्त विजय मगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नांद्रे यांनी भेट दिली.