PM Kisan Samman Nidhi 15th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता उद्या (दि. 15 नोव्हेंबर) खात्यात जमा होणार आहे.
किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ई-केवायसी लगेच करुन घ्यावी. इ केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस झारखंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 7200 कोटी रुपयांच्या विविध योजनांची पायाभरणी करणार आहेत. त्यासोबतच अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी PM किसान योजनेचा 15 वा हप्ता म्हणून 18 हजार कोटी रुपये जारी करणार आहेत.
विशेष म्हणजे, पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तर 15 वा हप्ता उद्या जमा होईल.