PSL स्पर्धेतील ‘हा’ व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; विकेट घेतल्यानंतर आफ्रिदीनं केलं असं काही की…

नवी दिल्ली – सध्या पाकिस्तान मध्ये पाकिस्तान सुपर प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 11 वा सामना लाहोर कलंदर आणि कराची किंग संघात खेळला गेला. हा सामना लाहोर कलंदर संघाने 6 विकेट्सने जिंकला. मात्र या सामन्या दरम्यान फलंदाजी करत असलेला बाबर आझम आणि गोलंदाजी करत असलेला शाहीन आफ्रिदी यांच्यात एक किस्सा घडला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

ज्यामुळे जेंटलमॅन खेळाची प्रतिष्ठा वाढली आहे. एका उत्कृष्ट खेळ भावनेचे प्रदर्शन कराची किंग आणि लाहोर कलंदर दरम्यान झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले. घडले असे की प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या कराची किंग संघाकडून पाकिस्तानचा दमदार फलंदाज आणि कराची किंग संघाचा सलामीवीर बाबर आझम मैदानावर उतरला होता.

त्यावेळी लाहोर कलंदर संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी शाहीन आफ्रिदी आला होता. त्याने आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर बाबर आझमचा त्रिफळा उडवला. हे पाहून बाबर आझम चकीतच झाला. त्यानंतर असे काही घडले की, ज्यामुळे शाहीन आफ्रिदी वर कौतुकांचा वर्षाव सुरू झाला.

शाहीन आफ्रिदीने आपल्या आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बाबर आझमची विकेट घेतल्यानंतर त्याच्या जवळ गेला आणि हसू लागला. त्याने 5 धावा काढून बाद झालेल्या बाबर आझमच्या खांद्यावर हात ठेवला आणि सॉरी बोलू लागला. या दोन दिग्गज खेळाडूंना अशा प्रकारे बघून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत शाहीन म्हणाला, ‘बाबर हा जगातील एक नंबरचा फलंदाज आहे, तर त्याला बाद केल्यानंतर मला वाटले की सेलिब्रेशन करायला नको. यासाठी त्याला जाऊन सॉरी म्हणालो.’ त्यामुळे आता बाबर आणि शाहीन आफ्रिदी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.