मोदींच्या लसीकरणाने संभ्रम दूर होतील – डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली – ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेचा पहिल्या दिवशीच लस घेतल्याने साठ वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांमध्ये असणारे लसीबाबतचे संभ्रम दूर होतील, असे मत एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले.

भारत बायोटेकने विकसित केलेली संपूर्ण स्वदेशी बानावटीची कोव्हॅक्‍सिन या लसीचा पहिला डोस मोदी यांनी आज घेतला. पंतप्रधानांनी लस घ्यावी म्हणून एम्सने रविवारी सायंकाळी पुढाकार घेतला. मात्र, त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी सोय केली नव्हती, असे गुलेरिया यांनी सांगितले. हा आमचा नेहमीप्रमाणेच दिवस होता. ते सकाळी लवकर आल्याने रुग्णांची कोणतीही अडचण झाली नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

पुदुचेरीतील मुळच्या असणाऱ्या परिचारिका पी. निवेदिता यांनी पंतप्रधानांना लस दिली. निवेदितांना पहाटे या महत्वाच्या कामाची माहिती देण्यात आली होती. मोदी पहाटे साडे सहाच्या सुमारास रुग्णालयात आले. आचारसंहितेप्रमाणे ते अर्धा तास रुग्णालयात देखरेखीखाली थांबले. त्यानंतर ते परत गेले, असे एम्सच्या डॉक्‍टरांनी सांगितले.

मी माझा करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. आपले डॉक्‍टर आणि संशोधकांनी करोनावरील लढाईत महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे ट्विट मोदी यांनी त्यानंतर केले. ही लस घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांनी ही लस घ्यावी, असे मी आवाहन करतो. आपण एकत्रितपणे भारत करोनामुक्त करूयात, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारने 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना करोनावरील लस एक मार्चपासून मिळेले. ही लस सरकारी रुग्णालयात मोफत मिळेल तर खासगी रुग्णालयात विकत मिळेल, असे सरकारने बुधवारी स्पष्ट केले होते.

लस घेतल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया काय होती, असे विचारता सिस्टर निवेदिता म्हणाल्या, ते म्हणाले, लगा बी दिया. पताभी नही चला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.