मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना कोठडीत बिछाना आणि खुर्चीची व्यवस्था करण्याचा आदेश पीएमएलए कोर्टाने दिला आहे. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. तसेच त्यांना पाठीच्या कण्यांचा त्रास असल्याने त्यांनी आज कोर्टात ही विनंती केली होती.
ती विनंती कोर्टाने मान्य केली पण मधुमेह व रक्तदाबाच्या विकारामुळे कमी मीठ असलेले घरचे जेवण घेण्याच्या त्यांच्या विनंतीवर मात्र कोर्टाने कोणताही निर्णय दिला नाही. त्यांच्या प्रकृतीच्या संबंधातील वैद्यकीय अहवाल तपासून आम्ही त्यावर निर्णय देऊ असे कोटाने म्हटले आहे.
त्यांच्या कोठडीची मुदत 4 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. मलिक यांना ईडीने अटक केली असून त्याच्या कोठडीच्या मुदतीत वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीपासून ते अटकेत आहेत. सध्या ते ऑर्थररोड कारागृहात आहेत.