दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट 7 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची आणि चित्रपटातील गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. मंजुळे यांनी चित्रपटाचे प्रमोशनही तेवढ्यात जोरदार पद्धतीने सुरु ठेवले आहे.
राज्यातील विविध भागात जाऊन तेथिल शाळा, महाविद्यालय व इतर ठिकाणी सर्व टीमसह जावून ते प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता तो चाहत्यांना खुप आवडला आहे. तसेच आता ‘हान की बडीव’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ते देखील चाहत्यांना खुप आवडल्याच्या कमेंट चाहते करत आहेत.
नागराज मंजुळे हे या सिनेमात राया पाटील नावाच्या एका कडक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. ‘गुन गुन’ आणि ‘आहा हेरो’ ही दोन गाणी आधीच प्रदर्शित झालीत. आता ‘हान की बडीव’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील नागराज आण्णाचा लुक पाहून सिंघम चित्रपटातील अजय देवगणच्या एॅक्शनची आठवण येते. मात्र चाहत्यांना सिंघमपेक्षा आण्णाचा लुक जास्त आवडला असल्याचे चाहते सांगत आहेत.
नागराज आण्णा बॉलीवुड आणि टॉलीवुड ला नक्कीच मागे टाकणार…, असे प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात नागराज मंजुळेंसह आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.