नवी दिल्ली – सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहून एका व्यक्तीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. तो व्यक्ती प्रेमाने फोटोचे चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. तो त्यांना भरपूर आशीर्वाद देतो. त्यांच्या पोस्ट ऑफिस खात्यात 1000 रुपये मिळाल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत. जगाची मने जिंकणारे असे पंतप्रधानांचे वर्णन त्यांनी केले आहे. हा व्हिडिओ कर्नाटकातील आहे.
ही व्यक्ती कर्नाटकातील शेतकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसवर पीएम मोदींचा फोटो पाहून तो भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
@narendramodi @PMOIndia @AmitShah @ANI @anandmahindra @republic @BJP4India A farmer in Karnataka has shown
his deep affection for and
gratitude to our beloved Prime Minister in an emotional video. pic.twitter.com/DR3g0FVE7M— MOHANDAS KAMATH (@MOHANDASKAMATH3) March 28, 2023
या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींनी त्यांना सर्व काही दिले. त्यांच्या पोस्ट ऑफिस खात्यात 1000 रुपये आले. पीएम मोदींनी त्यात आणखी 500 रुपयांची वाढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद आला आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण जग जिंकले आहे. त्यांना नतमस्तक होतो, असे तो म्हणत आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक तो खूप शेअर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचे किती प्रेम आहे हे या व्हिडिओतून दिसून येते. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याचेही यावरून दिसून येते. विशेषत: खेड्यातील लोकांना या योजनांचा भरपूर फायदा झाला आहे.