मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळेच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अखेर या चित्रपटाचा टीजर प्रदर्शत झाला आहे. नेहमीप्रमाणे नागराजने प्रेक्षकांसाठी काहीतरी हटके आणल्याचे ट्रेलवरून समजते.यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेमंत जंगल अवताडेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे.घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे.
ट्रेलरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे पार्श्वसंगीत आणि अभूतपूर्व ॲक्शन. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. यात प्रेमकहाणीही बहरत देखील दिसत आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात.
चित्रपटाबद्दल निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ”अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल.