पुणे – शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. शहर आणि काही उपनगरांतील आणखी 22 परिसर पूर्णपणे सील केले आहेत. तसेच प्रशासन व पोलीस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहेत. पालिका प्रशासनाकडूनही करोनाविषयाच्या सूचना व उपाययोजना नागरिकांपर्यत पोहचविण्यात येत आहेत. त्याच्या या कार्यात अनेक सामजिक तसेच शैक्षणिक संस्थादेखील हातभार लावत आहेत.
दरम्यान महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतर्फे कोरोना संदर्भात जगजागृतीसाठी एक संकल्पना राबविण्यात आली आहे. या संस्थेतर्फे कर्वेनगर येथील वारजेमाळेवाडीकडे जाणाऱ्या उड्डाऩ पूलाखालील रस्त्यावर कोरोना विषाणूची प्रतिकृती रेखाटण्यात आली असून त्यासोबत संदेश लिहून जनजागृती करण्यात आली आहे.
रेखाटण्यात आलेल्या प्रतिकृतीव्दारे शासनाचे नियम पाळू, कोरोना संक्रमण टाळू, पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करू असा संदेश लिहत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.