नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज १० हजारांचा टप्पा पार केला असून देशामध्ये आतापर्यंत १०३६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे युद्धपातळीवर काम सुरु असून योग्य त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अशातच आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वार्तालापामध्ये देशामध्ये आजमितीस २,३१,९०२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले किट्स भारताकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सध्या आपल्याकडे आणखी ६ आठवडे पुरेल एव्हडा साथ उपलब्ध असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे रमन गंगाखेडकर यांनी दिली. भारताने आयात केलेली ३३ लाख आरटी-पीसीआर किट्स व ३७ लाख रॅपिड किट्स देखील लवकरच पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली.