भोपाळ – मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काॅंग्रेस 7 आणि बीएससी एक जागेवर आघाडीवर आहे. तसेच बिहारमध्येही भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारनंतर आता मध्यप्रदेशातही काॅंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.
भाजप नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून भाजपच्या उमेदवारांचं अभिनंदन केलंय. तसेच त्यांचे आभार मानले आहेत.
मप्र विधानसभा उपचुनावों में विजयी हुए भारतीय जनता पार्टी के सभी प्रत्याशियों को हार्दिक शुभकामनाएं। वहीं सभी देवतुल्य मतदाताओं का हृदय से आभार।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप सभी विजयी उम्मीदवार जनसेवा और अपने विधानसभा क्षेत्र के समुचित विकास के लिए सदैव तत्पर रहेंगे| @BJP4India
— Jyotiraditya M. Scindia (मोदी का परिवार) (@JM_Scindia) November 10, 2020
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्विटद्वारे राज्याच्या जनतेचे आभार मानलेत. ‘जनतेने पुन्हा एकदा विकास आणि जनकल्याणचा संकल्प ठेवणाऱ्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी दिली, हे स्पष्ट दिसतंय,’ असं ट्विट करत त्यांनी जनतेचे आभार मानले.
राज्य की जनता ने एक बार फिर विकास और जनकल्याण के लिए संकल्पित @BJP4MP को मध्यप्रदेश की जिम्मेदारी सौंपने का निर्णय ले लिया है। यह स्पष्ट दिखाई दे रहा है।
प्रदेश विधानसभा के उपचुनाव के परिणाम को पार्टी के प्रदेश अध्यक्ष श्री @vdsharmabjp और साथियों के साथ देख रहा हूं। pic.twitter.com/yE4RiTG7mP
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) November 10, 2020
मार्चमध्ये काॅंग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. काॅंग्रेसची संख्या कमी झाल्याने राज्यातील सरकार पडलं होतं. 25 आमदारांचा राजीनामा आणि तीन आमदारांचं निधन यामुळे रिक्त झालेल्या 28 जागांवर 3 नोव्हेंबरला पोडनिवडणूक घेण्यात आली होती.