IPL 2021 – आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला 9 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्स संघाला या हंगामापूर्वी मोठा झटका लागू शकतो. कारण टीम मॅनेजमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आतापर्यंत पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याचबरोबर याबाबत सीएसकेला कोणती ही माहिती नाही की, जडेजा केव्हा संघसोबत जो़डला जाईल.
रवींद्र जडेजा बाबत सीएसकेचे सीईओने माहिती दिली आहे. सीईओचे म्हणाले की, “जडेजा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.” तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “जडेजा संघासोबत केव्हा जोडला जाईल, याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे जडेजाला इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी-20 मालिकेत सहभागी होता आले नाही. त्याचबरोबर पुणे येथे सुरु असलेल्या वनडे मालिकेत ही समावेश केला नाही. काही दिवसापुर्वी जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर त्याने लिहले होते की, पुन्हा एकदा बॅट पकडून चांगले वाटत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जडेजा लवकरच सीएसकेच्या संघासोबत जोडला जाईल असे तर्क लावले जात होते. सीएसकेच्या दृष्टीने अष्टपैलू रवींद्र जडेजा खुप महत्वपूर्ण खेळाडू आहे. परंतु ज्याप्रकारे सीएसकेच्या सीईओने सांगितले, त्यानुसार वाटते जडेजा कदाचित आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतो. सीएसकेचे अधिकत्तर खेळाडू मुंबईत संघासोबत जोडले गेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सराव सत्राला ही सुरुवात झाली आहे.