कोईमतूर – पहिल्या फेरीत वर्चस्व राखत विजेता ठरलेला मंगळूरचा डिन मॅसकॅरेन्स याने आपली सातत्य कायम ठेवत आयएनआरसीच्या दुसऱ्या रॅली ऑफ कोईमतूमध्ये आघाडीचे ध्येय ठेवले आहे. अर्थात याचित क्लबचे रॅलीतील राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी ही त्यांची आघाडी महत्वाचीच ठरणार आहे. आठवडाअखेर कोण बाजी मारतो याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
आयएनआरसी दोनचा चालक श्रृपता पडिवाल हा त्यांच्याबरोबर असेल. तथापि वेगवेगल्या युक्त्या करून या बदलत्या वातावरणात नेमके कशापध्दतीने रन करतात हे महत्वाचे असेल. प्रामुख्याने त्याचे लक्ष हे आयएनआरसीमध्ये तिसरा असलेला फाबीद अहमेर(सहचालक सनाथ जी) यांच्या सांघिक कामगिरीकडेही असेल. या दुसर्या फेरीत कोण आपली गुणवत्ता सिध्द करून चांगली कामगिरी बजावतो हेच महत्वाचे ठरणार आहे.
तीनदा एपीआसी चॅम्पियन्स असलेल्या आणि जेके टायर्सचा टिम सहकारी गौरव गील बद्दलचं डीनला काळजी वाटते. गील आणि मुसा शेरीफ यांनी महिंद्रा अँडव्हेंचेरसाठी कॅम्पयेनसाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत सलामीलाच पोडीयम फेरीतील स्थान त्यांनी दिमाखात गाठले होते.
पहिल्या फेरीतील काही स्टेजमध्ये गौरवला आपल्या गाडींच्या खराबीनंतरही उल्लेखनीय कामगिरी नोंदवल तृतीय स्थान राखले .त्यानंतर दक्षिण डेअर स्पर्धेतील त्यांचे थरारक आघाडी घेत नोंदवलेले जेतेपद निश्चित आयएनआरसीचे सातवे विजेतेपद राखण्यासाठी उत्साह वाढविणारे आहे.
आर्का मोटारस्पोर्टसचा राहुल कंत्राज(सहचालक विवेक भट) हे सुध्दा गौरव गिलनंतर समुहात(ओव्हरऑल स्टॅंन्डींग) दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. हे दुसरे स्थान अबादित राहण्यासाठी आयएनआरसीदोनच्या गटात कायम राहण्याचा त्याचा प्रयत्न असेल. सांघिक विजेता (टिम चॅम्पियन्स) अर्जुन राव (सहचालक शनमुगा सुंदरम) हे आणखी एक सर्वीत्तम चालक म्हणून ओळखले जातात. विजेतेपद राखण्यासाठी हे दोघेही आपली आघाडी कायम ठेवतील असे वाटते. आयएनआरसी 3 गटात हे दुसऱ्या स्थानी आहे. याच गटातील फबीद अहमेरपेक्षा चांगली कामगिरी बजावण्याचा त्याचा प्रयत्न राहिल.
आकर्षणाचा भाग बनलेली रॅली ऑफ कोईमतूरने एक वेगळाच विक्रम यंदा केला आहे. तो म्हणजे 65 संघ(टिम)नी आपल्या प्रवेशिका नोंदवल्या.त्यापैकी सांघिक विजेतेपदासाठी 25 संघ उतरले आहे. आयएनआरसीच्या रॅलीतील हा एक विक्रमच म्हणता येईल. या रॅलीचा कालावधी दोन दिवसांचा आहे. या दोन दिवसात 141.09 किलोमिटरचे अंतर असेल त्यातील 119.70 किलोमिटरचे आठ स्टेजेसमधील अंतर हे चालकांची सत्वपरिक्षा पाहणारे असेल.