गिरिकंद चषक बास्केटबॉल स्पर्धा
पुणे – मुलींच्या गटात सरदार दस्तुर, डेक्कन जिमखाना अ, चोंडे पाटील आणि डेक्कन जिमखाना ब च्या संघांनी आपाअपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. तर, मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना अ आणि अभिनवच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीखेळाडूंचा पराभव करत येथे होत असलेया 14 व्या कै. इंदिराबाई जोशी स्मृती गिरिकंद बास्केटबॉल स्पर्धेत आगेकूच नोंदवली.
मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात सरदार दस्तुरच्या संघाने क्रॉस ओव्हरच्या संघाचा 42 विरुद्ध 17 गुणांनी पराभव करत सामना एकतर्फी आपल्या नावे केला. यावेळी सरदार दस्तुरच्या सुधिक्षा नायरने 17 तर तन्वी साळवेने 8 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी क्रॉस ओव्हरच्या खुशी सांगवीने 10 गुण करत एकाकी लढत दिली. तर, दुसऱ्या सामन्यात डेक्कन जिमखानाच्या अ संघाने आयडीयलचा 41 विरुद्ध 30 गुणांनी पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी डेक्कन जिमखाना अ संघाकडून आर्या रिस्वडकरने 12 गुण केले. तर, आयडीयल संघाकडून ओशिनी अजनिकरने 12 गुण करत एकाकी लढत दिली.
यावेळी झालेल्या तिसऱ्या सामन्यात चेंडे पाटील अकादमीच्या संघाने बिशप्सचा 34 विरुद्ध 24 गुणांनी पराभव करत आगेकूच केली. यावेळी चोंडे पाटीलच्या सई ब्राम्हनकरने 12 तर देवश्री पेठेने 8 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, बिशप्सच्या शिवांजली पंडीतने 10 गुण करत एकाकी लढत दिली. तसेच या गटातील अखेरच्या सामन्यात डेक्कन जिमखाना ब च्या संघाने विद्यांचलच्या संघाचा 73 विरुद्ध 43 अशा मोठ्या फरकाने पराभव करत आगेकूच केली. यावेळी डेक्कन जिमखाना ब संघाकडून इलियाना देवधरने सर्वाधिक 16 गुण केले. तर, युक्ती चोरडीयाने 12 गुण करत तिला सुरेख साथ दिली. तसेच विध्यांचलच्या राजनंदिनी निंबाळकरने सर्वाधीक 16 गुण करत एकाकी लढत दिली.
तर, मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना अ संघाने मिलेनियम क्लबचा 52 विरुद्ध 25 अशा फरकाने पराभव करत आगेकूच केली. यावेळी डेक्कन जिमखाना संघाचा राजेंद्र सिंगने 19 तर अमन शेखने 11 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, मिलेनियमच्या गौरंग गर्जेने सर्वाधीक 7 गुण केले. तर, दुसऱ्या सामन्यात अभिनवच्या संघाने व्होबाच्या संघाच्या 46 विरुद्ध 19 गुणांनी पराभव करत आगेकूच नोंदवली.