नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशात नव्याने सापडलेल्या करोना रूग्णांची संख्या लक्षात घेता देशातील एकूण करोना रूग्णांची संख्या आता 94 लाख 31 हजार इतकी झाली आहे.
तथापि आज नव्याने करोना बाधित सापडण्याचे प्रमाण 40 हजारांपेक्षा कमी झाले आहे ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब मानली जात आहे. गेल्या 24 तासांत करोनाचे एकूण 38 हजार 772 रूग्ण आढळून आले.
गेल्या 24 तासांत 443 करोना बाधितांचे निधन झाल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 1 लाख 37 हजार 139 इतकी झाली आहे. देशातील सध्या सक्रिय बाधितांची संख्या 4 लाख 46 हजार 952 इतकी आहे.