‘या’ देशातील कारागृहात ‘कैद्यां’मध्ये भीषण ‘दंगल’; आठ कैदी ठार, 37 जखमी

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबो जवळील एका कारागृहात कैदी आणि सुरक्षा जवान यांच्यात जोरदार धुमश्‍चक्री झाली. काही कैद्यांनी एकत्रितपणे बळाचा वापर करून जबरदस्तीने कारागृहाचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही धुमश्‍चक्री झाली. त्यावेळी अधिकाऱ्यांना बळाचा वापर करावा लागला. त्यात एकूण आठ जण ठार झाले तर अन्य 37 जण जखमी झाले.

कैद्यांमध्ये करोनाचा धोका पसरण्याची भीती निर्माण झाली होती. श्रीलंकेतील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या मोठी आहे. तेथे गर्दीने ठेवण्यात आलेल्या कैद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होण्याची शक्‍यता असल्याने कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी अनेक कारागृहांमध्ये कैद्यांनी आंदोलन केले आहे.

तसेच आंदोलन या कारागृहातही झाले होते पण त्याकडे कारागृह अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कैद्यांचा सयंम सुटला. कैद्यांनी स्वयंपाक घर आणि रेकॉर्ड रूमला आग लावली. कारागृह प्रमुखांना ओलिस ठेवण्याचाही प्रयत्न कैद्यांनी केला पण तो हाणून पाडण्यात आला असा दावा पोलिसांनी केला.

श्रीलंकेच्या कारागृहांमध्ये दहा हजार कैदी ठेवण्याची क्षमता असताना तेथे एकूण 26 हजाराहून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यातील एक हजार कैद्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कैदी अस्वस्थ होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.