CoronaVirus : 24 तासांत 70 हजार 421 बाधित; 3921 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 70 हजार 421 करोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या 74 दिवसांतील हा नीचांकी आकडा आहे. या नव्या बाधितांमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या आता 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 इतकी झाली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 3 हजार 921 रुग्ण मरण पावल्याने देशातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता एकूण 3 लाख 74 हजार 305 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय बाधितांच्या संख्येतही मोठी घट झाली असून, आता देशात एकूण 9 लाख 73 हजार 158 रुग्ण सक्रिय बाधित आहेत.

देशातील करोनाचा रिकव्हरी रेट 95.43 टक्के इतका सुधारला आहे. दरम्यान, काल दिवसभरात देशात एकूण 14 लाख 92 हजार 152 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.