दिलासादायक! तज्ज्ञ म्हणतात, करोनाच्या दुसऱ्या ‘लाटे’ची शक्यता कमी

नवी दिल्ली – देशात नव्या बाधितांची संख्या 45 हजाराच्या आत असण्याच्या आणखी एक दिवसाची नोंद झाली. त्यामुळे करोनाची लाट येण्याची शक्‍यता अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गुरुवारी देशांत 43 हजार 279 बाधितांची नोंद झाली. बुधवारी ही संख्या 44 हजार 739 होती.
या आठवड्यात नव्या बधितांची संख्या 45 हजाराच्या आतच राहात आहे. तरीही देशातील एकूण बाधितांची संख्या 93 लाखांवर जाऊन पोहोचली. गुरुवारी करोना बळींची संख्याही बुधवारच्या तुलनेत कमी होते. गुरुवारी 485 जणांचा मृत्यू झाला.

बुधवारी ही संख्या 531 होती. मात्र सक्रिय बाधितांची संख्या गुरुवारी तीन हजारने वाढली. या पूर्वी ही वाढ दिवसाला सात हजाराच्या घरात असे. त्यामुळे एकूण सक्रिय बाधितांची संख्या 15 हजारांनी वाढली आहे.

महाराष्ट्रात प्रथमच 22 ऑक्‍टोबरनंतर देशांत सर्वाधिक बाधितांची नोंद झाली. एकूण सहा हजार 406 बाधित नोंदवण्यात आले. दिल्लीत पाच हजार 475 केरळ पाच हजार 378 तर प. बंगालमध्ये तीन हजार 507 बाधित आढळले. 28 ऑक्‍टोबरनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित प्रथमच आढळले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.